बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन हे तीन दिवसीय बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात निर्मला सितारमन यांनी गुरुवारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून केली. आज सकाळी त्यांनी खंडेरायाच्या मंदिराला भेट दिली. देवस्थानच्यावतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी जेजुरी संस्थानच्या पदाधिकऱ्यांची बैठकही घेतली.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी गुरुवारी खडकवासला अणि भाेर तालुक्यातील दाैरा केल्यानंतर शुक्रवारी बारामती, पुरंदर तालुक्याचा दाैरा करत आहेत. सितारमन यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या गडावरील मंदिराची पाहणी करत मंदिराचा इतिहास विश्वस्तांकडून जाणून घेतला.
निर्मला सितारमन यांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन त्या जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांची संवाद साधला. सकाळी दहा वाजता जेजुरी येथेच पुरंदर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दुपारी बारा वाजता मोरगाव येथे शासकीय अधिकाऱ्यांसमवेत त्या आढावा बैठक घेणार आहेत. निर्मला सितारमन यांनी खंडेरायचे दर्शन घेण्यासाठी पाेलीसांनी चाेख बंदाेबस्त जेजुरी गडावर ठेवला हाेता.