ध्यास विश्वसार्ह बातमीचा

यंदा मान्सूनचे आगमन तळकोकणात “या” तारखेला होणार

दिल्ली : मान्सून बाबत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सून सर्वसाधारण १ जूनला केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असे  हवामानशास्त्रज्ञ एम. राजीवन यांनी म्हटले आहे.

याआधी हवामान विभागाने जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून यंदा सामान्य राहील असा अंदाज वर्तवला होता. सरासरी ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस सामान्य समाजला जातो. यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते.

यंदा मान्सून दरम्यान एल निनो चा प्रभाव कमी राहणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने याआधी दिले आहे. भारतीय मान्सूनवर एल निनो आणि ला निना आणि या प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानाचा प्रभाव राहतो. या स्थितीकडे भारतीय हवामान विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.

मान्सून १ जूनला केरळमध्ये धडकल्यानंतर साधारणपणे ७ जूनपर्यंत त्याचे तळकोकणात आगमन होते. तर त्यानंतर १० जून पर्यंत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापून टाकतो. त्यानंतर १५ जूनपर्यंत पूर्व भारतातील राज्य गुजरात आणि मध्यप्रदेशचा बहुतांशी भाग मान्सूनने व्यापतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!