ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अफगाणिस्तान संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मांडली अमेरिकेची भूमिका

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानमधून सैनिकांच्या माघारीच्या निर्णयावर आपण अजूनही ठाम असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे.

जो बायडन यांनी काही वेळेपूर्वी देशाला संबोधित केले. अफगाणिस्तान मधून अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलावल्यानंतर तालिबानने ज्या प्रकारे तिथे पुन्हा कब्जा केला त्यावरून अमेरिका आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका होत आहे. यावर बायडन यांनी आपली भूमिका मांडली.

मी आपल्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षांनी अतिशय कठीण निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्यासाठी चांगली वेळ कधीच नव्हती. आम्ही मोठी जोखीम उचलली. त्यानुसार आम्ही सैन्य माघारी केली. पण यानंतर तालिबान पुन्हा अफगाणिस्तावर कब्जा करेल, याचा अंदाज आम्हाला होता. पण इतक्या वेगाने तालिबान ताबा मिळवेल असं वाटलं नव्हतं, असं बायडन म्हणाले.

अफागाणिस्तानमध्ये अमेरिकेचे मिशन हे देश उभारण्याचे नव्हते, असं बायडन यांनी स्पष्ट केलं. अफगाणिस्तामधील सध्याच्या स्थितीला तेथील राष्ट्रपती अशरफ गनी जबाबदार आहेत. अशरफ गनी यांनी आपल्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभं रहायला हवं होतं. पण ते न लढताच रणांगण सोडून पळून गेले. पण अमेरिकेने हिंमत सोडलेली नाही. दहशतवादाविरोधात आमची लढाई सुरूच राहील, असं बायडन यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!