ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रीकांत भैरामडगी तर उपसरपंचपदी लक्ष्मीबाई पोमाजी यांची निवड

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व साधारण उमेदवार म्हणून श्रीकांत भैरामडगी यांना सरपंच व सर्वसाधारण महिला लक्ष्मीबाई पोमाजी यांना उपसरपंच म्हणून निवड करण्यात आले.

श्रीकांत भैरामडगी हा ग्रामपंचायत मध्ये संगणक अपरेटर म्हणून काम करत होते. जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकामध्ये भरघोस मताने निवडून आले.१५ सदस्य असलेले वागदरी ग्राम पंचायत मध्ये कोणत्याही पक्ष्याला बहुमत मिळाले नाही. शिवानंद घोळसागाव यांच्या नेतृत्वामध्ये माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक हरहर महादेव पॅनलच्या माधमातून निवडूक लढविले होते. त्यामध्ये सहा सदस्य निवडून आले. अपक्ष सदस्य यांचे मदतीने सत्ता स्थापन केले.तहसील कार्यालयाचे विजयकुमार गायकवाड अध्यासी अधिकारी म्हणून काम पहिले . ग्रामसेवक लक्ष्मण अंधारे व तलाठी राहुल जमदाडे सहायक अधिकारी म्हणून काम पहिले. निवड प्रक्रियेनंतर झेडपी सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सदस्या अंबुबाई मंगणे यांच्यासह श्रीकांत इंडे, कावेरी नंजुंडे , सुजाता घुले, सिंधुदाई सोनकावडे, शारदाबाई रोटे, पंकज सुतारा, शिवानंद घोळसगांव उपस्थित होते. नंतर परमेश्वर मंदिरात झालेल्या समारंभात सदस्यांचे सत्कार करण्यात आला.

मल्लप्पा निरोळी, माजी जि.प.सदस्य विजयकुमार ढोपरे, धोंडप्पा यमाजी, रवी वरनाळे, सुधीर सोनकवडे , माणिक निलगार , मलकप्पा पोमाजी, श्रीमन्त भैरमडगी, उमेश पोमाजी, रवी पोमाजी, राम पोमाजी, मल्लिनाथ भासगी, शिवराज पोमाजी, मल्लिनाथ ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने वागदरी गावाला एक आदर्श गाव मॉडेल व्हिलेज बनविण्यासाठी एकत्र काम करून ते गावातील मुख्य समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. तरुणासाठी उद्योग निर्मिती करणार. वागदरी गावचे सर्वतोपरी विकास करण्याचे प्रयत्न राहील- श्रीकांत भैरामडगी
नूतन सरपंच

गाव स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी कठोर परिश्रम करणार. सर्वांच्या सहकार्याने पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या गावातील मुख्य समस्यांकडे विशेष लक्ष दिले जाईल. – लक्ष्मीबाई पोमाजी
नूतन उपसरपंच

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!