वीर सावरकर म्हणजे त्याग, स्वातंत्र्य, बंधुभावाचे प्रतीक, अक्कलकोट शहरात वीर सावरकर चौक फलकाचे अनावरण
अक्कलकोट,दि .८ : वीर सावरकर म्हणजे त्याग, स्वातंत्र्य, बंधुभाव या त्रिसूत्रीचे प्रतीक आहेत म्हणून या चौकाचे नाव सावरकर चौक आहे, असे प्रतिपादन नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांनी केले. अक्कलकोट शहरातील सावरकर चौक या ठिकाणी वीर सावरकर फलक नूतनीकरण अनावरण समारंभ पार पडला.
या फलकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश, उत्सव, विविध विषयातील सामाजिक कार्याच्या आयोजनाची माहिती तसेच निधन वार्ताची माहिती या फलकाच्या माध्यमातून देण्यास उपयोगी ठरणार आहे. याचे उद्घाटन नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, प्रथमेश जोजन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, तम्मा शेळके, संतोष वगाले , चंद्रकांत वेदपाठक, संजय झिपरे, संजय भागानगरे उपस्थित होते.
यावेळी सावरकर प्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल जाधव यांनी केले तर आभार शिवशंकर स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राहुल वाडे, प्रसन्न गवंडी, प्रशांत गवंडी, प्रथमेश जोजन, सचिन कलबुर्गी यांनी परिश्रम घेतले.