विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्शन मोडवर ; शिवसेनेच्या दोन्ही गटांना पाठवली नोटीस, लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसह ठाकरे गटाच्या १५ आमदारांना नोटिस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाच्या आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही गटाचे आमदारांना बोलावून देखील विधानसभा अध्यक्ष चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भात निर्णय घेतील असे सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांना नव्वद दिवसांची मुदत दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच या प्रकरणाबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.