ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बस वेळेवर सोडले नाही तर रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन

अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यातील खेडे गावाला जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील किणी,काझीकंबस,किणीवाडी तडवळ व इतर गावाचे बस सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गैरसोय होत आहे शाळा कॉलेज सुटल्या नंतर रात्री उशिरा मुक्काम बसने घरी परतावे लागत आहे विद्यार्थीनी उशिरा घरी परतायचे म्हणजे पालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आहे यामुळे रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी आगर प्रमुख यांना निवेदन देऊन बस सेवा सुरळीत व वेळेवर सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. तरी बससेवा सुरळीत व वेळेवर करण्यात यावी आणि जेणेकरून नादुरुस्त खेड्यात पाठवू नये कारण जरी बस नादुरुस्त होउन वाटेत अर्धवट थांबला तर पाठीमागे दुसऱ्या बस नसल्याने विद्यार्थ्यांच्या गैरसोय होत आहे. तरी संबंधित अधिकारी जातीने लक्ष घालून गैरसोय दूर करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

याप्रसंगी रिपाइं अक्कलकोट तालुका सचिव राजू भागळे, रिपाइं अक्कलकोट शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे, युवा नेते आकाश माने, बसवराज सोनकांबळे,अनिल धसाडे,आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!