ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आषाढी एकादशीला महापूजेसाठी वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, 20 वर्षांपासून विठ्ठल मंदिरात देत आहेत वीणा वादनाची सेवा…

पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा वर्ध्यातील वारकऱ्याला मिळाला आहे. ७१ वर्षीय केशव शिवदास कोलते हे येत्या 20 जूलैला सपत्नीक पूजा करतील. गेल्या २० वर्षापासून कोलते हे मंदिरात वीणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.

काेविड 19 चा प्रार्दुभाव लक्षात घेता घेऊन यंदा शासनाने पायी वारीवर बंदी घातली आहे. याबराेबरच आषाढी एकादशी दिवशीही श्री विठ्ठल – रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. यंदा देखील वीणेकरी यांना महापूजा करण्याचा मान देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. चिठ्ठीच्या माध्मयातून केशव काेलते यांची निवड झाली आहे. त्यांच्यासमवेत पत्नी इंदबाई या असणार आहेत.

दरम्यान आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वाखरी येथील पालखी तळावर प्रशासनाने सोयी सुविधा तयार केलेल्या आहेत. येत्या 20 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी मानाच्या दहा पालख्यातील 400 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या दहा पालख्या 19 जुलैला वाखरी येथील पालखी तळावर एसटीने येणार आहेत. पालखी तळावर प्रत्येक पालखीसाठी स्वतंत्र मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!