ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय! हिरवाईने नटलेल्या कॅम्पसमध्ये पक्षांचा चिवचिवाट

सोलापूर, दि.25- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने हा उपक्रम राबविला आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हजारो निसर्गवेली असून यामुळे येथे कायम पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येतो. विविध प्रकारचे शेकडो पक्षी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आढळून येतात. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांना थंड पाण्याची सोय व्हावी, यासाठी कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी पाणठ्याची सोय करण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार विद्यापीठ कँपसमध्ये हजारो विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहेत. दर वर्षी उन्हाळ्यातही विद्यापीठ परिसर या वृक्षवेलीमुळे हिरवाईने नटलेला असतो. वृक्षवेलींनाही ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पक्षांची रेलचेल असते. विद्यार्थी, शिक्षक व येणाऱ्या प्रत्येकाला येथे पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट ऐकून एक वेगळा आनंद मिळतो. त्यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार पक्षांसाठी पाण्याची सोय कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी पाणवठे तयार करून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!