ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिलादिनी गोगावमध्ये झाला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अक्कलकोट,दि. ८ : अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता मधुकर सुरवसे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप जगताप, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, वैद्यकीय अधिकारी लिंगराज नडगेरी, ग्रामसेवक बिरप्पा वडरे, मधुकर सुरवसे, कलप्पा वाडे, बाबुराव बिराजदार उपस्थित होते.यावेळी गावातील विविध क्षेत्रातील महिलांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला प्रतिनिधी म्हणून बोलताना मृणालिनी सुरवसे म्हणाल्या की, भारत देश स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाले आज देखील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी आजच्या जागतिक महिला दिनाचा आदर्श घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात देखील महिलाच्या हक्कासाठी व न्यायाकरिता लढा देणे गरजेचे आहे. आपलं गाव सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे व आपल्या घरातील शौचालय आपण वापरल्यास रोगराईचे प्रमाण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी गावातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेकडून नूतन सरपंच वनिता सुरवसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन चोल्ले व नितीन गायकवाड यांनी केले. आभार बाबासाहेब बनसोडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!