अक्कलकोटच्या जुना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बीण बुरूज ढासळला वास्तूचे संवर्धन होण्याची गरज,नागरिकांची अपेक्षा
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट ऐतिहासिक जूना राजवाड्याचा उत्तरेकडील दुर्बिण बुरुज बुधवारी अचानकपणे ढासळला.गौरवशाली ऐतिहासिक वास्तूची जपणूक व्हावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
अक्कलकोट संस्थानची स्थापना छत्रपती संभाजी राजे यांचे पूत्र श्रीमंत शाहू महाराज यांनी १७०७ साली केली होती आणि श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले (पहिले)
यांना गादीवर बसविले होते.पहिले फत्तेसिंह राजे भोसले अत्यंत पराक्रमी होते.त्यांनी रायगड किल्ला
मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला होता.मध्यप्रदेशसह बंगाल, बिहार आणि दक्षिणेतील त्रिचनापल्ली, तंजावर जिंकले होते.या सर्व मोहिमा याच ऐतिहासिक जूना राजवाड्यामधूनच आखल्या आणि जिंकल्या होत्या.याच राजवाड्यात श्री स्वामी समर्थ वावरले होते अशा
३७३ वर्षा पूर्वीच्या ऐतिहासिक जूनाराजवाड्याचा उत्तरे कडील दुर्बिण बुरुज ढासळला आहे.
अक्कलकोट राजघराण्याच्या गौरवशाली इतिहासाची जपणुक अक्कलकोट संस्थानचे वारसदार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी करावी,अशी अपेक्षा जनतेतून
व्यक्त होत आहे.कारण श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचा दत्तकविधान सोहळा येथेच संपन्न झाला होता दरबार आणि देवघर याचं वास्तूत आहे. अक्कलकोट राजघराण्याच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास आहे त्याचा साक्षीदार जूना राजवाडा आहे.
जूना राजवाडा वास्तू आणि बुरूजावर अनेक झाडेझुडपे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत ती वेळीच काढून टाकली असती तर ही वेळ आली नसती,अशी प्रतिक्रिया
व्यक्त होत आहे.