ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी, शिवसेनेने दिले निवेदन

 

अक्कलकोट, दि.१७ : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सर्व तालुकाप्रमुख यांना आपापल्या तालुक्याच्या विकासासाठी निवेदन देण्यास सांगितले होते. अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटीची मागणी केली.अक्कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिर असुन इथे दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन भक्त येतात म्हणुन शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यानी अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून १६६ कोटी रु तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर केले.अद्याप पर्यंत केवळ ३० कोटी रु निधी मिळाला आहे त्यामुळे अक्कलकोटचा विकास थाबंला असुन उर्वरित निधी मंजूर करावे,अशी मागणी संजय देशमुख यांनी केली आहे.अक्कलकोटच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, लवकरच १०० कोटी रु निधी तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर करू, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.यावेळी बोलताना संजय देशमुख म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत शहरातील पालखी मार्गाचे रुंदीकरण व सुशोभीकरण, पंढरपूरप्रमाणे भक्तांच्या निवासासाठी भव्य भक्तनिवास, अत्याधुनिक पध्दतीचे संस्कृतीत भवन,अक्कलकोट शहरासाठी रोज पाणीपुरवठा करण्यासाठी हिळ्ळी येथुन दुहेरी पाईपलाईन करणे,बायपास रोड जवळील मिनाताई ठाकरे उदयानाचे सुशोभीकरण करणे व व्यापारी संकुल बाधंणे,एम एस ई बी चौक ते मंदिर पर्यंत विद्युतीकरण करणे,एवन चौक ते शिवपुरी(यज्ञनगर) पर्यंत विद्युतीकरण व सुशोभीकरण करणे,स्व.बाळासाहेब ठाकरे चौक येथील तारामाता उद्यान सुशोभीकरण करणे, एस टी बस स्टॅड अत्याधुनिक व सुशोभीकरण इत्यादी विकासकामे करण्यात येणार आहे,असे म्हणाले.यावेळी प्रगतशील शेतकरी शिवपुत्र बिराजदार, सोपान निकते, शहरप्रमुख योगेश पवार उपप्रमुख प्रविण घाटगे,प्रा.सुर्यकांत कडबगावकर, आनंद बुककानुरे, सैपन पटेल, युवासेना शहर प्रमुख विनोद मदने, दुधनी शहर प्रमुख संतोष गद्दी, प्रसिद्धीप्रमुख बसवराज बिराजदार, खंडु कलाल यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!