---Advertisement---

चंद्रग्रहणामुळे उद्या राज्यातील ‘हे’ मंदिर राहणार दर्शनासाठी बंद!

By team
On: March 2, 2026 10:13 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील बारावे ज्योतिर्लिंग असलेले श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी (३ मार्च) खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत दर्शनासाठी बंद राहणार आहे. ग्रहणकाळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्याने मंदिर प्रशासनाने सुधारित दर्शन वेळापत्रक जाहीर केले आहे.

३ मार्च रोजी होळी (धूलिवंदन) सण असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र दुपारी ३:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. लांबून येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी या वेळेची नोंद घेऊन आपले नियोजन करावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे व देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. योगायोगाने मंगळवारी वेरूळ लेणीचा साप्ताहिक देखभाल दिवस असल्याने लेणी पर्यटकांसाठी बंद असतात. त्यामुळे त्या दिवशी दुपारी मंदिरही बंद राहणार असल्याने बाहेरगावांहून येणाऱ्या पर्यटकांना लेणी व मंदिर या दोन्ही ठिकाणच्या दर्शनापासून काही काळ मुकावे लागणार आहे. प्रशासनाने होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

दर्शनाचे सुधारित वेळापत्रक

  • दर्शन बंद होण्याची वेळ: दुपारी ३:०० वाजेपासून

  • चंद्रग्रहण कालावधी: दुपारी ३:२० ते सायंकाळी ६:४७

  • शुद्धीकरण व महापूजा: सायंकाळी ६:४७ ते ७:०० — मंदिराची स्वच्छता व विशेष शुद्धीकरण पूजा

  • दर्शन पुन्हा सुरू: सायंकाळी ७:०० वाजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले

ग्रहणानंतर शुद्धीकरण विधी पूर्ण झाल्यावर नियमित पूजा व दर्शन सुरू होईल, असे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भाविकांनी गर्दी टाळण्यासाठी सकाळच्या वेळेत दर्शन घेण्याचा पर्याय निवडावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!