अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट ; भेटीदरम्यान ‘या’ विषयावर झाली चर्चा…
अक्कलकोट : अक्कलकोटच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्याबाबतीत शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली.या भेटीदरम्यान अक्कलकोटच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली.
येत्या १२ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने तालुक्यात व जिह्यात विविध कार्यक्रम आयोजित रण्यासंदर्भात खास करून ही बैठक होती.या बैठकीमध्ये अक्कलकोट शहर व तालुक्यातील नुतन अक्कलकोट बस स्थानक, ग्रामीण भागातील रस्ते, अक्कलकोट शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नुतन हिळ्ळी पाईपलाइन व श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन ही कामे मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली.त्यावेळी पवार यांनी हे प्रश्न सोडवू,अक्कलकोट हे तिर्थक्षेत्राचे ठिकाण आहे त्याठिकाणचा विकास होणे फार गरजेचे आहे.यापुढच्या काळात अक्कलकोटवर आमचे जास्त लक्ष राहील.आपण चांगले काम करा,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे,युवा नेते शिवराज स्वामी, माणिक बिराजदार, विक्रांत पिसे यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित होते.