ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये उद्या खगोलीय आकाशीय घटना पाहण्याचे आयोजन

 

अक्कलकोट दि. १९ :  अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी . बी. खेडगी इंटरनॅशनल शाळेत सोमवारी ( दि. २१ डिसेंबर ) सायंकाळी ७ ते रात्री साडे नऊ वाजता  खगोलीय आकाशीय घटना पाहण्याचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवशरण खेडगी व मुख्याध्यापिका विश्वजा दर्यापूरकर यांनी दिली.

सरत्या वर्षात २१ डिसेंबर २०२० ची रात्र आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक खगोलीय आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. या  दिवशी रात्री साडेसात ते साडेनऊ या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.

असा हा दुर्मिळ योग बघण्याची सोय अक्कलकोट शहरात प्रथमच खेडगी इंटरनॅशनल शाळेनी केली आहे.अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे विद्यार्थी व पालक वर्ग तसेच समस्त खगोलप्रेमी यांना या अभूतपूर्व घटनेचा अनुभव घेता येईल, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापिका विश्वजा दर्यापूरकर, भूगोल शिक्षक विनय अय्यर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!