---Advertisement---

अक्कलकोटमध्ये उद्योजक महिबुब शेख शिवसेनेच्या संपर्कात

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट,दि.२० : तालुक्यात इतर पक्षातील अनेक नेत्या बरोबर उद्योजक, व्यापारी, शिक्षक, व इतर मंडळी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यानी सांगितले.आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूकीची तयारी शिवसेनेकडुन जय्यत तयारी सुरु असून अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत, व होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी चाचणी सुरू असून अनेकजण शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत, अक्कलकोट शहरातील प्रसिद्ध उद्योगपती (विकास समुह) चे महिबुब शेख हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे उत्कृष्ट कार्य व शिवसेना पक्षात कार्यकर्त्यांना बळ मिळतो त्यामुळे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे व तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मि शिवसेनेत काम करणार आहे असे महिबुब शेख म्हणाले शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस योग्य सन्मान दिले जाईल असे तालुका उपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगांवकर म्हणाले.यावेळी शहरप्रमुख योगेश पवार, उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, प्रविण घाटगे, सैपन पटेल, इस्माईल जमादार, रजाक सय्यद,महिला महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण ,शहरप्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख  ताराबाई कुभांर, प्रसिद्धी प्रमुख बसवराज बिराजदार, खंडू कलाल, युवासेनेचे विनोद मदने उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!