---Advertisement---

वाढदिवसानिमित्त जनसेवेचा उपक्रम; भारत गल्लीमध्ये बोअरवेलचे काम सुरू

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन
कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवेचा उपक्रम राबवत भारत गल्ली येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी बोअरवेल मारण्याचे काम
सुरू करण्यात आले आहे. नगरसेवक देविदास कवटगी व नगरसेविका सोनाली विक्रम शिंदे यांनी स्वखर्चातून हा उपक्रम हाती घेतला आहे.

प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांची पाण्याची मूलभूत गरज भागवली जावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी नागरिकांच्या गरजेला प्राधान्य देत प्रत्यक्ष जनहिताचा उपक्रम राबविल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या उपक्रमामुळे भारत गल्ली परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे महत्त्वाचे असून, जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राजू हिप्परगी, गजानन पाटील, तात्या समाणे,बाळा शिंदे तसेच भारत गल्ली मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!