---Advertisement---

सिध्दाराम म्हेत्रेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार ; वाढदिवसानिमित्त घेतले समर्थांचे दर्शन 

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट- तालुक्याचे मा.आमदार व माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ६२ व्या वाढदिवसाप्रित्यर्थ श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, श्रीफळ, देवून यथोचित सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना म्हेत्रे यांनी मी व माझे कुटुंबीय हे पुर्वीपासूनच स्वामीचे निस्सीम भक्त असुन अक्कलकोटहुन जात असताना स्वामींचे दर्शन घेऊनच पुढील कामाकारीता मार्गक्रमण करतो. स्वामींचे आशिर्वाद नेहमीच माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून यापुढील जीवनातही राजकीय व सामाजिक जीवन कार्य असेच वृद्धिंगत होत रहावे याकरीता स्वामींच्या चरणी प्रार्थना करुन साकडे घातले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी महेश इंगळे यांनीही वाढदिवसाप्रित्यर्थ म्हेत्रे यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रथमेश म्हत्रे, सर्फराज शेख, शिवराज स्वामी, मंगल पाटील, रामचंद्र समाणे, मैनोदीन कोरबू, मुबारक कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, महेश गोगी, संजय पवार, दिपक जरिपटके, रामचंद्र समाणे, सागर गोंडाळ, गिरीष पवार, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!