---Advertisement---

जमिनीवर बसून जेवला टीम इंडियाचा स्टार ; व्हिडिओ व्हायरल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेला सूर्यकुमार यादव चक्क जमिनीवर बसून मित्रांसोबत मटण-भाकरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. या पार्टीमध्ये क्रिकेटपटू सरफराज खानदेखील सहभागी झाला होता. दोन्ही खेळाडूंचा साधेपणा पाहून चाहते आणि नेटकऱ्यांकडून त्यांचे जोरदार कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव आपल्या मित्रांसोबत घरगुती नॉनव्हेज पार्टीचा आनंद घेताना दिसतो. विशेष म्हणजे, कोणताही मोठेपणा किंवा दिखावा न करता तो जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहे. सूर्यकुमारच्या शेजारी सरफराज खानदेखील बसलेला दिसतो. ६५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जात असतानाही त्याची साधी राहणी पाहून नेटकरी प्रभावित झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार माणिक भाऊंचे विशेष कौतुक करताना दिसतो. ‘माझ्या बाजूला माणिक भाऊ बसले आहेत. त्यांनी आमच्यासाठी मटण बनवले आहे. दुसरे भाऊ आमच्यासाठी गरमागरम भाकऱ्या बनवत आहेत. अगदी घरच्यासारखे, अस्सल देशी पद्धतीचे चविष्ट मटण तयार केले आहे,’ असे तो सांगतो.

यानंतर सरफराज खाननेही जेवणाचे कौतुक केले. ‘जेवण खूप छान बनवले आहे. सध्या काही बोलण्याची इच्छा नाही. बोलण्यापेक्षा फक्त जेवण करावेसे वाटत आहे,’ अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. दोन्ही क्रिकेटपटूंनी जेवण बनवणाऱ्या मंडळींचे आभार मानले.

मुश्ताक अली ट्रॉफीत सूर्याची तुफानी खेळी

दरम्यान, सूर्यकुमार यादव सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सूर्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २१ चेंडूंमध्ये ६० धावा ठोकल्या. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

या सामन्यात मुशीर खाननेही दमदार फलंदाजी केली. त्याने २४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. सूर्यकुमार आणि मुशीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या २३ चेंडूंमध्ये ६५ धावांची भागीदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला.

एकीकडे मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारा सूर्यकुमार, तर दुसरीकडे मित्रांसोबत जमिनीवर बसून घरगुती जेवणाचा आनंद घेणारा त्याचा साधेपणा, या दोन्ही गोष्टींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!