---Advertisement---

विधान परिषद निवडणुकीचा भत्ता रखडला; शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर | प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा निवडणूक भत्ता अद्याप बँक खात्यात जमा झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन बराच कालावधी उलटूनही भत्ता मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित भत्त्याची रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी केली.

निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही वेळेचे बंधन न ठेवता आपली जबाबदारी पार पाडली. मात्र, कर्तव्य पूर्ण करूनही हक्काचा मोबदला मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची बाब अन्यायकारक असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना भत्ता वेळेत देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला. लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली असून, आता प्रशासनानेही आपली जबाबदारी पार पाडावी. कोणतीही दिरंगाई न करता प्रलंबित भत्त्याची संपूर्ण रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी. अन्यथा कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षक समितीला तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा गुरव यांनी दिला.

निवेदन देताना पदाधिकारी उपस्थित

यावेळी राज्य कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव, प्रकाश कोळी, राजकुमार गोब्बूर, अशोक कोगनुरे, रमाकांत सोनार, तालुकाध्यक्ष शंकर अजगोंडे, संजीवकुमार बन्नेसूर, सैदप्पा कोळी यांच्यासह समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक आणि कर्मचारी निवडणूक, जनगणना तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत मिळणे आवश्यक आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी आणि रखडलेला निवडणूक भत्ता तातडीने जमा करावा, अशी ठाम भूमिका शिक्षक समितीने मांडली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!