---Advertisement---

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चार मतप्रवाह!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या बैठका आणि चर्चांमधून पुढील राजकीय रणनीती आखली जात आहे. अशातच विलिनीकरण करून सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, यावरून शरद पवार गटात चार वेगवेगळे मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील बहुतांश ज्येष्ठ आमदार दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण करून सत्तेत जाण्यास अनुकूल आहेत. यापूर्वी अजित पवार हयात असताना विलिनीकरणाबाबत १७ बैठका झाल्याची चर्चा होती. त्यावेळीही सत्तेत जाण्याच्या निर्णयप्रक्रियेत शरद पवार सक्रिय नसतील, अशी भूमिका मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांचा सत्तेत जाण्याच्या भूमिकेला विरोध असल्याचे समजते. मात्र, रोहित पाटील यांनी पक्ष जो अंतिम निर्णय घेईल, तो मान्य असेल, अशी भूमिका घेतल्याची माहिती आहे. काही आमदारांचे मत मात्र विलिनीकरण करण्याऐवजी स्वतंत्र गट म्हणून सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण घडामोडींमध्ये कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यांनी अद्याप आमदारांशी याबाबत चर्चा केलेली नसून कोणताही अंतिम निर्णयही घेतलेला नाही. सध्या त्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत, तर शरद पवार मुंबईत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत विलिनीकरण आणि सत्तेत सहभागी होण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!