---Advertisement---

सरकारी तिजोरीत १४.४२ लाख कोटींचा महसूल जमा!

Follow Us:
---Advertisement---

देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात चालू आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सरकारचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १४.४२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच कालावधीत १२.९० लाख कोटी रुपये जमा झाले होते. म्हणजेच यंदा कर संकलनात ११.७६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कॉर्पोरेट कर संकलनाने यंदा चांगली कामगिरी केली आहे. मागील वर्षीचे ५.३६ लाख कोटी रुपयांचे संकलन यंदा वाढून ६.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यात १७.८४ टक्क्यांची वाढ झाली. तर वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंबे आणि इतर घटकांकडून मिळणाऱ्या निव्वळ कर महसुलात ५.३० टक्क्यांची वाढ होऊन तो ७.५६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

शेअर बाजारातील व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) मधून मिळणाऱ्या महसुलात सर्वाधिक वाढ दिसून आली. मागील वर्षी ३५,६८१ कोटी रुपये असलेले एसटीटी संकलन यंदा वाढून ५४,०७७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यात ५१.५६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

दरम्यान, सरकारने करदात्यांना दिलेल्या परताव्याच्या रकमेतही वाढ झाली आहे. १० नोव्हेंबरपर्यंत ३.०८ लाख कोटी रुपयांचे कर परतावे देण्यात आले असून, मागील वर्षी ही रक्कम २.४५ लाख कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने २६.९७ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत या लक्ष्याच्या जवळपास ५३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!