---Advertisement---

कुलगाममध्ये सीआरपीएफच्या पथकावर गोळीबार; तीन जवान जखमी

Follow Us:
---Advertisement---

जम्मू-काश्मीर, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सीआरपीएफच्या सुरक्षा पथकावर अतिरेक्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरात धाव घेतली. सीआरपीएफकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. तसेच संपूर्ण परिसराची घेराबंदी करून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

घटनास्थळी रुग्णवाहिका आणि चिलखती वाहनांसह सुरक्षा दलांचा ताफा दाखल झाला. अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या घटनेनंतर सीआरपीएफने निवेदन जारी केले. कुलगाम जिल्ह्यातील एका नाक्यावर तैनात सुरक्षा दलाच्या जवानांवर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढल्याचे सीआरपीएफने स्पष्ट केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!