---Advertisement---

आयफोनच्या हौसेपोटी सुनेचा प्रताप; 53 ग्रॅम सोन्यावर मारला डल्ला

Follow Us:
---Advertisement---

नागपूर : महागडा आयफोन खरेदी करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी एका सुनेने चक्क आपल्या सासूचे सोन्याचे दागिने चोरून विकल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातील शांतीनगर परिसरात उघडकीस आला आहे. सासूने कपाटात जपून ठेवलेले तब्बल ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने सुनेने विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशांत ॲपल कंपनीचा महागडा आयफोन खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रंथाली आकाश वर्मा असे आरोपी सुनेचे नाव असून, तिची सासू राधा वर्मा यांनी याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा वर्मा यांना शिर्डी येथे दर्शनासाठी जायचे होते. प्रवासाचा खर्च करण्यासाठी आणि सोबत काही दागिने नेण्यासाठी त्यांनी घरातील कपाट उघडले. मात्र, कपाटात ठेवलेले ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दागिने गायब झाल्याने राधा वर्मा यांना मोठा धक्का बसला. त्यांनी सुनेला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने दागिने घेतल्याची कबुली दिली आणि लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वारंवार मागणी करूनही दागिने परत न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपासादरम्यान चौकशी केली असता, सुनेने दागिने विकून त्यातून मिळालेल्या पैशांत आयफोन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!