---Advertisement---

कॅब चालकाचा भयानक कट; पत्नी, सासूसह ७ जणांची हत्या!

Follow Us:
---Advertisement---

बंगळूरू वृत्तसंस्था : कर्नाटकची राजधानी बंगळूरूमधून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. पत्नी माहेरच्या लोकांशी सतत संपर्कात राहत असल्याच्या रागातून एका कॅब चालकाने सासरच्या सात जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. इंदुशेखर असे आरोपीचे नाव असून, त्याने पत्नी सुनीता, सासू, दोन मेहुणे, दोन भावजय आणि सात वर्षांच्या चिमुरड्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पत्नीशी वारंवार होणारे वाद आणि सासरच्या मंडळींकडून पत्नीची घेतली जाणारी बाजू यामुळे आरोपीच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यातून त्याने प्रथम पत्नीची हत्या केली. त्यानंतर पार्टी देण्याच्या बहाण्याने दोन्ही मेहुण्यांना घरी बोलावून त्यांची हत्या केली. सासू, दोन्ही भावजय आणि सात वर्षांच्या पुनीतलाही त्याने लक्ष्य केल्याचा आरोप आहे. हत्येसाठी दगडाचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे.

हत्येनंतर आरोपीने मृतदेह कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. रक्ताचे डाग पुसण्यासाठी रसायनांचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. चौकशीदरम्यान आरोपीच्या जबाबात विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.

आरोपीने दाखवलेल्या ठिकाणांवर पोलिसांनी नंदी हिल्सच्या पायथ्याशी शोधमोहीम राबवली. सुमारे चार तासांच्या शोधानंतर सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह सापडला. मात्र, उर्वरित सहा जणांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. या प्रकरणाच्या तपासासाठी डीसीपी वेस्ट यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!