---Advertisement---

एसटीच्या सवलतींसाठी स्मार्ट कार्डची मुदत वाढली; महिलांना मोठा दिलासा!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : एसटी महामंडळाच्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्वीप्रमाणेच प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी आणि वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कार्ड नोंदणीला गती देण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नोंदणी अपूर्ण असलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!