---Advertisement---

ऑडिओ क्लिपचा सोर्स देण्यास जरांगे तयार; सोलापूर प्रकरणावरही केले भाष्य!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ५०० कोटींच्या आरोपांशी संबंधित ऑडिओ क्लिप जाहीर करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता एसआयटीने तपास सुरू केला असून पोलिसांनी जरांगे यांना पत्र पाठवून ऑडिओ क्लिपचा स्रोत विचारला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी क्लिप देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, क्लिपचा स्रोत सांगण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेची हमी मिळाली पाहिजे, अशी अट त्यांनी घातली आहे. क्लिप मंत्र्यांकडेही असल्याचा दावा करत, तपासासाठी ती देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, सोर्सच्या जीवाला काही होता कामा नये, असे आश्वासन मिळाले पाहिजे, असे जरांगे म्हणाले. यासंदर्भातील पत्र वकिलामार्फत देण्यास सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ऑडिओ क्लिपमध्ये पैशांच्या जोरावर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. विरोधात बोलणाऱ्यांचा धनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

दुसरीकडे, सोलापूरमध्ये एका व्यक्तीवर मकोका लावण्यात आल्याच्या प्रकरणावरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. संबंधित व्यक्ती आपला सहकारी असल्याचे सांगितले जात असले, तरी या प्रकरणाची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘राज्यात माझे सहकारी कोण नाहीत? सहा कोटी मराठा समाज माझा सहकारी आहे. कोणाचाही फोटो जोडायचा आणि जुना सहकारी असल्याचे सांगायचे, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे,’ असा टोला त्यांनी लगावला.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!