---Advertisement---

बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणात धक्कादायक आरोप; अंधारेचा चाकणकरांना सवाल

By team
On: March 18, 2026 2:34 PM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

नाशिकमध्ये ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अंधारे यांनी आरोप केला की, खरात याच्यावर आधीही लैंगिक शोषणाचे आरोप आल्यावर चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता.

सुषमा अंधारे यांनी म्हटले: “आता आम्हाला शंका नव्हे, भीती आहे. पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करून रूपाली चाकणकर अशा लिंगपिसाट माणसाला मदत करत असतील, तर याची जबाबदारी कोण घेणार?”

विशेष म्हणजे, खरात यांनी अनेक राजकीय नेत्यांना आपले भविष्य जाणून घेण्यासाठी भेट घेतले असल्याचे समोर आले आहे. या ज्योतिषीच्या संस्था आणि कार्यक्रमात अनेक अघोरी पूजा, हाताची करंगळी कापणे अशा वेगळ्या विधींचेही लोकांमध्ये चर्चेने भिती निर्माण केली आहे.

सुषमा अंधारे यांनी पुढे सवाल उपस्थित केला की, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर महिला असतानाही, अशा प्रकरणात भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी रूपाली चाकणकर यांना पदावर ठेवणे योग्य ठरेल का? या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठा खळबळ माजली असून, महिला आयोगाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यावरही सवाल निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!