---Advertisement---

दिवाळीनिमित्त महाप्रसाद सेवेतील लाभार्थ्यांना फराळ किटचे वाटप

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या समर्थ महाप्रसाद सेवेतील लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ किटचे वाटप करण्यात आले. आपुलकी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था आणि नवभारत मित्र मंडळ, कारंजा चौक यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाप्रसाद सेवा सुरू आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या गरजू लाभार्थ्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने आपुलकी संस्थेच्या वतीने फराळ किट न्यासाकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, आपुलकी संस्थेचे विशाल (मुन्ना) राठौर, अविराज सिद्धे, अप्पू कलशेट्टी, शैलेश राठौर, अंबादास निंबाळे, अनिल बिडवे, अमर पाटील, सुरेश कातनळ्ळी, नितीन कटारे, शिवलिंग कलबुर्गी, पिंटू राठोड, शाम पुकाळे, ईश्वरी लोणारी, संजय घनाते, बाबू पुकाळे, विजू मुरकडे, विष्णू शिंपाळे, प्रकाश टाके, रुपेश कपुरे, सलीम हगलदिवटे, समर्थ आळगी, राहुल राठौर, संतोष राठौर, बालाजी सुरवसे, सर्फराज शेख, मल्लय्या स्वामी, आर्यन राठौर, विराज राठौर, आशिष राठौर, शक्ती पाटील, अमित पाटील, सुरेश कतनाळी यांच्यासह बाळासाहेब पोळ, निखील पाटील, योगेश कटारे, प्रवीण घाडगे, अतिश पवार, शुभम सावंत, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर आणि विठ्ठल रेड्डी उपस्थित होते. तसेच सेवेकरी, कर्मचारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!