---Advertisement---

रोहित पवार यांचा उद्या अक्कलकोट तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कर्जत जामखेड चे आमदार रोहित राजेंद्र पवार हे अक्कलकोट शहर तालुक्यातील दुष्काळ पाणीप्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, वीजपुरवठा, विद्यार्थी, कामगार, रोजगार, असे विबिध प्रश्न तसेच उजनी धरणावारील नियोजित अन्यायकारक प्रकल्प याबत सविस्तर जनजागृती साठी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन दिलासा देण्यासाठी नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी अक्कलकोट तालुका दौरा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश सुरवसे यांनी दिली.

यावेळी आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य आनंद तानवडे राष्ट्रवादी प्रदेश चे प्रशांत बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते ओम कत्ते, शिवसेना शहर प्रमुख राम जाधव, तालुकाप्रमुख रवी डोके, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गंगाधर मोरे, महाविकास आघाडीसह समविचारी संघटना व पक्षाचे चे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 7:15 वाजता स्वामी समर्थ मंदिर दर्शन घेऊन मंदिर परिसरात शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर जेऊर येथे शेतकरी व कष्टकरी कुटुंबाना भेटी देऊन अडचणी समजून घेतील. करजगी परिसरातील शिवारात पीकपाहणी करून माहिती घेणार आहेत. त्यानंतर 10:00 वाजता तडवळ येथील जयशंकर प्रशालेत सिद्रामप्पा पाटील प्रतिष्ठान आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यास उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संजीवकुमार पाटील, रमेश पाटील, शिवानंद पाटील, आनंद तनवडे, यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यात अक्कलकोट शहर तालुक्यातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नोकरदारवर्ग युवक वर्ग आदींनी मोठया संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!