---Advertisement---

भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू,

Follow Us:
---Advertisement---

लातूर, वृत्तसंस्था : राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. जिल्ह्यातील टाका पाटीजवळ कार, दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तायप्पा दिगंबर बंडगर आणि ओंकार गोपाळ बंडगर अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरहून औसाकडे जात असताना टाका पाटीजवळ भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील तायप्पा दिगंबर बंडगर आणि ओंकार गोपाळ बंडगर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, चारचाकी कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर वाहने रस्त्याच्या कडेला पडली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव वाहनांमुळे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!