---Advertisement---

अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक! अमित शाहांकडे केली मोठी मागणी;

Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावुक झाले. अजितदादा हे कणखर, शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व होते, अशा शब्दांत त्यांनी दादांच्या कार्याचा गौरव केला. त्याचवेळी अजित पवार यांच्या निधनासंदर्भातील चौकशी अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करावा, अशी मोठी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुतळा अनावरण आणि प्रवेशद्वार नामकरण सोहळ्यात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन केले.

अजितदादांच्या अचानक जाण्याने मनाला मोठा चटका लागल्याची भावना व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, दादा हे अत्यंत कणखर, शिस्तबद्ध आणि प्रशासनाची उत्तम जाण असलेले नेते होते. राज्याचे वित्तमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन केले. कामातील गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती.

चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

अजित पवार यांच्या निधनानंतर जनसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना उत्तरे मिळावीत आणि सत्य समोर यावे, यासाठी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करण्याची विनंती आपण अमित शाह यांच्याकडे केली आहे. यावर शाह यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार!

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला. अजितदादांच्या कार्याचा आणि त्यांच्या शिस्तप्रिय नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी त्यांनी बोलून दाखवला.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!