ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये स्वच्छतेसाठी दीडशे नागरिकांनी घेतली शपथ

अक्कलकोट  : अक्कलकोट नगरपालिकेच्यावतीने शहरातील स्वच्छता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण प्रेम जागृत करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ फत्तेसिंह क्रीडांगणावर करण्यात आला.नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

या अभियानाची सुरुवात फत्तेसिंह मैदानावर करून या मैदानाची चोहोबाजूने स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छतेमध्ये शंभर ते दीडशे सामान्य नागरिक, क्रीडाप्रेमी, व्यायाम  प्रेमी,मॉर्निंग वॉकला येणारे सर्व नागरिक त्याशिवाय नगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. प्रारंभी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर मैदान झाडून कचरा वेचण्यात आला.या उपक्रमामुळे राष्ट्रीय ,राज्य तसेच स्थानिक खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे,असे प्रतिपादन पक्ष नेते महेश हिंडोळे यांनी केले.सकाळी दोन ते तीन तास ही मोहीम राबविण्यात आली.

या पुढच्या काळात अक्कलकोट शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार असून याबद्दलची जनजागृती, पर्यावरणातील बदल,वृक्षलागवड यासंदर्भातील महत्त्व जनतेला पटवून देणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी रमेश कापसे,श्रीशैल चनशेट्टी,प्रशांत स्थावरमठ, डॉ.बसवराज नंदीकोले, शिवराज स्वामी,कल्याणी पाटील, श्रीशैल स्वामी, श्रीशैल पाटील,इक्बाल टिनवाला, अविनाश राठोड, रामचंद्र समाणे, सागर शिंदे,धानप्पा कामाठी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!