अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यात
गुरुवारी रॅपिड अँटीजन टेस्टच्या माध्यमातून दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९४६ झाली आहे.
आतापर्यंत ग्रामीणमध्ये ५७१ आणि शहरामध्ये २२६ असे ७९७ रुग्ण हे बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अक्कलकोट तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे ५१ जणांचा बळी गेला आहे. आज आरोग्य विभागाने २३२ जणांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या आहेत. त्यामध्ये दहा जण पॉझिटिव्ह आले असून मुगळीमध्ये २, किणी मध्ये ४, सिंदखेडमध्ये १, अक्कलकोट शिवाजीनगरमध्ये १ आणि दहिटणे येथे २ रुग्ण पॉझिटिव्ह झालेले आहेत. अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप कायम असून नागरिक टेस्टिंगसाठी पुढे येत नाहीत त्यामुळे कोरोनाचा शिरकाव अजूनही वाढत आहे त्यामुळे जनतेने ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत त्यांनी पुढे येऊन तपासणी करून इतरांना संसर्ग होण्यापासून वाचवावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.