अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट तालुक्यात नेहरू युवा केंद्र अक्कलकोटच्यावतीने तालुक्यातील विविध संस्थांना विविध प्रकारच्या क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात
आले.हा कार्यक्रम हन्नूर येथे पार पडला. सदर साहित्य हे तरुण मंडळ व नोंदणी असणाऱ्या संस्थाना वाटप करण्यात आले. यामध्ये हॉलीबॉल व फुटबॉल या खेळाला प्राधान्य देण्यासाठी आणि देशामध्ये क्रिडाचे विश्व निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ग्रामीण भागापर्यंत हॉलीबॉल आणि फुटबॉल सारखे खेळ असावेत यासाठी नेहरू युवा केंद्राचा हा प्रयत्न सुरु आहे.यापुढे असे प्रोत्साहनपर उपक्रम घेणार आहोत,असे सांगण्यात आले.
या साहित्याचे वाटप हन्नुरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
ग्रामविकास अधिकारी दयानंद बिराजदार हे होते.यापुढे असे आम्ही उपक्रम राबवत राहू,असे प्रतिपादन नेहरू युवा
केंद्राचे तालुका समन्वयक गौतम बाळशंकर यांनी केले.यावेळी सिद्धार्थ सोशल फाउंडेशन गोगाव , लाॅड बुद्धा प्रतिष्ठान, हन्नुर भीम प्रकाश बहुउद्देशीय सामाजिक संस्था,अक्कलकोट छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ वागदरी,नेहरू युवा मंडळ हिळ्ळी ,सम्यक बहुउद्देशीय सहकारी संस्था अक्कलकोट साधी संस्था यामध्ये तरुण
मंडळ यांना हे साहित्य देण्यात आले.यावेळी इंदुमती शहा , नागनाथ जकिकोरे, अर्जुन जळकोटे, महेश चीतले,लॉर्ड
बुद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष बाळशंकर, रेवणसिद्ध सुतार, लक्ष्मण पुजारी, प्रकाश हताळे,तुळशीराम इरवाडकर,सागर बंदीछोडे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.गौतम बाळशंकर यांनी केले.