मुंबई,दि.१० : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा येथे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी नागपूरहुन भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगडाले यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत.दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेतील श्रीमती गीता विश्वनाथ बेहरे यांच्या सोणझरी वस्तीत असलेल्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच तुमसर तालुक्यातील सालेकसा येथील कविता बारेलाल कुमरे या महिलेला भेटून या दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन केले.
घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे आपल्या दुःखात मी सहभागी आहे. शासन आपल्या सोबत असल्याची यावेळी त्यांनी सागितले.