ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्नछत्र मंडळाचे शिवसृष्टी दालन भक्तांच्या सेवेत रुजू

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जगात प्रथमच कोरीव कलेतून साकारलेल्या धातुचित्र, शिल्पकला छत्रपती शिवरायांच्या जन्मांपासून महानिर्वाणापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचा जिवंत कलाविष्कार ‘शिवसृष्टी’ कोरोनामुळे 8 महिन्यानंतर स्वामी भक्तांच्या सेवेत रुजू झाल्याने स्वामी भक्तांतून पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र कोवीड-19 चे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणीच्या माध्यमांतून टप्प्या-टप्प्याने दालनात सोडले जात आहे.

दरम्यान गुरुवार ‘श्रीं’ वारीच्या दिवशी मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते दालनाची विधिवत पूजा करुन प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्वामीसेवक बाळा घाटगे, प्रसाद हुल्ले, सिध्दाराम जाधव आदीजण उपस्थित होते. न्यासाचे छत्रपती शिवाजी महाराजांचा 250 ते 800 वर्षापूर्वीच्या कालखंडात घेऊन जाणार्‍या व त्यातून आपल्यालाल स्वराज्यासाठी मावळ्यांनी केलेल्या त्यागाची बलिदानाची यशोगाथा ह्या अभूतपूर्व कलेतून जिवंत साकारलेल्या शिवसृष्टी प्रदर्शनाच्या माध्यमांतून दाखवून युव प्रवर्तक शिवप्रभूंच्या न भुतो, नी भविष्यती अशा आसिम कार्यातून बोध घेऊन यावेत अशी शिवसृष्टी उभी करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!