मुंबई | अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने सोनू सूदचं निवासस्थान बेकायदा असल्याचं सांगत त्याला नोटीस बजावली आहे. यानंतर सोनू सूदने शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. पण सध्या महापालिकेकडून गंभीर आरोप होत असल्याने सोनू सूदने याविषयी चर्चा केल्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता.
Mumbai: Actor Sonu Sood paid a courtesy visit to NCP chief Sharad Pawar at the latter's residence today. pic.twitter.com/xTh8wpE9Bs
— ANI (@ANI) January 13, 2021
सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.