अक्कलकोट ,दि.८ : सोलापूर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर उभारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारक समितीवर मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील सुनिल बंडगर यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीवर अध्यक्ष म्हणून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, सचिव म्हणून विद्यापीठाचे प्रबंधक पत्र-कुलगुरु डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा, तर सदस्य म्हणून इंदोर संस्थानचे राजे भुषणसिंह होळकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गोपिचंद पडळकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, कुलसचिव डॉ. विकास घुटे, अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखा अधिकारी श्रेणीक शहा यांचा समावेश आहे.
हा पुतळा देशातील सर्वात मोठा आणि पुर्णाकृती पुतळा ठरणार आहे. तसेच त्याच्या बाजूने सुशोभीकरण होणार असून अँम्फिथिएटरही बांधले जाणार आहे, तर अध्यासन केंद्रात अहिल्यादेवींचे व त्यावर संशोधन चालणार आहे. सुनिल बंडगर हे गेल्या बारा वर्षांपासून सोलापूर, पुणे, अक्कलकोट तसेच राज्यात सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या समीतीवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवजी जानकर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनेकडून बंडगर यांचे अभिनंदन केले जात आहे..