मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज मुंबईसह देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहे. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यातील दरवाढीने पेट्रोलने ९० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या दरवाढीने सरकारविरोधात देशभरात आंदोलन झाले. मात्र त्यानंतर कंपन्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. सलग चौथ्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवण्यात आले.
असे आहे दर
राजधानी दिल्लीत पेट्रोल ८४ रुपयांच्या समीप असून तो उच्चांकी स्तर आहे.आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.