ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आधुनिक काळातील मानसिक समस्या दूर करण्यासाठी ‘रे मना’ मार्गदर्शक ठरेल : सुनील शिनखेडे,सोलापूरात ‘रे मना’ पुस्तिकेच्या ‘..तरीही जगू आनंदे’ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

 

सोलापूर, दि.१० : आधुनिक काळातील मानसिक समस्या दूर करण्यासाठी ‘रे मना’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे मत सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक तथा ज्येष्ठ कवी सुनील शिनखेडे यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे निमित्त साधून आत्मविकास व संशोधन केंद्रातर्फे मानसशास्त्रीय विषयावरील ‘…रे मना!’ या पुस्तिकेच्या ‘..तरीही जगू आनंदे’ या विशेषांकाचे प्रकाशन सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला इन सोलापूर चॅनलचे राजेश कुलकर्णी हे उपस्थित होते.
यावेळी श्री. सुनील शिनखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘आपल्याकडे मनाच्या क्षेत्रामध्ये गूढ वलय असून त्यावर काम करणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये असलेली संतपरंपरा आणि त्यांची शिकवण मन:शांती साठी उपयोगी आहे परंतु आधुनिक काळातील समस्या दूर करण्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता आहे, असे मत शिनखेडे यांनी व्यक्त केले.

मीडिया मध्ये काम करत असतानाचे अनुभव कथन करून श्री. राजेश कुलकर्णी यांनी सर्व लेखक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘अगदी योग्य वेळी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आत्ताच्या करोना संसर्गाच्या काळात आनंदी राहण्यासाठी ‘रे मना’ हे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, असे मत संस्थेच्या अध्यक्षा अलका काकडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पद्मजा गांधी यांनी केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख मानसी काकडे-कुलकर्णी यांनी करून दिली. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. स्वाती कोरके यांनी केले.
यावेळी डॉ. नभा काकडे, संतोष ऐदाळे, डॉ. रोहिणी शहा, मृणालिनी मोरे,अनिल गोडबोले भावना ऐवळे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!