---Advertisement---

सोलापुरातील जेष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचे हृदयविकाराने निधन

Follow Us:
---Advertisement---

 

 

सोलापूर,दि.११ : सोलापूरच्या ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यिक निर्मला उत्तरेश्वर मठपती यांचे (शनिवारी)रात्री १०-३० वाजता हृदयविकाराने निधन झाले, त्या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती उत्तरेश्वर मठपती एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा आज रविवारी’ दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० कनिष्क नगर, जूळे सोलापूर येथून निघणार आहे.
मनातलं आभाळ,बापडी माणसं, गुणी मुलं, काव्यरूप शामचीआई, झेट नावाचं बेट, मुलांसाठी उद्बोधक गोष्टी, वेटिंग लिस्ट, आणि संस्काराची शिदोरी यासह ३५ च्या वर त्यांची बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच त्यांनी कथा,कादंबरी,चरित्र लेखनही केलं आहे.

इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारतीच्या पाठ्य पुस्तकातून ‘मुग्धा लिहू लागली’ हा धडा प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या काही पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. निर्मला मठपती या महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या कार्यकारणी सदस्य होत्या.

त्यांच्यावर आज रविवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. निर्मला मठपती यांच्या निधनाने मराठी साहित्य परिषद एका बालसहित्यिकाला मुकली आहे अशा शब्दात महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!