---Advertisement---

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भव्य सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमोलराजे भोसले यांच्या हस्ते आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना श्री स्वामी समर्थांची मूर्ती, कृपावस्त्र आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे काका, मनोज निकम, शिवराज स्वामी, प्रदीप पाटील, प्रशांत लोकापूरे, मल्लिकार्जुन आळगी, शिवलिंग कलबुर्गी, नागनाथ कुंभार, स्वीय सहाय्यक धनंजय गाढवे, नागेश कलशेट्टी, लखन झंपले, सिद्धेश्वर मोरे, निखिल पाटील, शहाजीबापू यादव, अतिश पवार, बाळासाहेब घाटगे, शुभम सावंत, सतीश महिंद्रकर, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, राहुल इंडे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, प्रसाद मोरे, राजू म्हेत्रे, रुद्र स्वामी यांच्यासह न्यासाचे पदाधिकारी, विश्वस्त, सेवेकरी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!