अक्कलकोट (प्रतिनिधी) : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश मालक इंगळे यांचा वाढदिवस मॉर्निंग ग्रुपच्या वतीने उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट यांच्या हस्ते महेश मालक इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या सत्कारासाठी संजीव बिराजदार (देवा मशिनरी), उद्योगपती मल्लू बहिर्जी माळी, मुख्याध्यापक अशोक कलशेट्टी, विठ्ठल हेगडे आणि विरुपक्ष शिवगुंडे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी उपस्थितांनी इंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि स्वामी सेवेत अशीच उत्तरोत्तर प्रगती लाभावी, अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.
महेश मालक इंगळे यांनी देवस्थानच्या विकासासाठी आणि भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. स्वामी भक्तांच्या सेवेसाठी ते अहोरात्र कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली देवस्थानचा लौकिक वाढत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, स्वामी भक्त आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










