---Advertisement---

दिवाळीच्या गर्दीत सोलापूर एसटी विभागाची विक्रमी उत्पन्नाची भरारी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन
केलेल्या नियोजनामुळे सोलापूर विभागाने यंदा एसटीच्या जादा वाहतुकीत विक्रमी कामगिरी केली आहे. ५ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या अकरा दिवसांच्या कालावधीत विभागाने दररोज सरासरी ६८१ नियते चालवून एकूण २९ लाख ४० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या माध्यमातून विभागाला सवलती वगळून ११ कोटी ८ लाख ४५ हजार रुपये,
तर सवलतींसह १७ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.

दिवाळीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांची
गैरसोय होऊ नये, यासाठी विभागातील सर्व आगार व्यवस्थापक आणि त्यांच्या अधिनस्त पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी आगारात उपस्थित राहून वाहतुकीचे नियोजन केले. वाढीव
फेऱ्या, प्रवाशांची उपलब्धता आणि वाहतुकीचे व्यवस्थापन यावर विशेष लक्ष देण्यात आले.

या यशात विभागातील चालक, वाहक, यांत्रिक विभागातील कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. दिवाळीच्या काळात स्वतःची महत्त्वाची कामे बाजूला ठेवून त्यांनी प्रवासी वाहतुकीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या मेहनतीमुळेच ही विक्रमी कामगिरी शक्य झाल्याचे विभागाने नमूद केले.

या यशाबद्दल विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी आणि सोलापूर विभागातील प्रवासी जनतेचे आभार मानले. प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळावर दाखवलेला विश्वास या उत्पन्नवाढीत महत्त्वाचा ठरल्याचे त्यांनी ‘संचार’शी बोलताना सांगितले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!