---Advertisement---

दुष्काळग्रस्तांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय; आमदारांचे एक महिन्याचे वेतन देणार!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. दिवाळीत सरकारकडून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली असून, आणखी मदतीचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी एक महिन्याचे वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांच्या वतीने वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत करणे, हीच अजितदादांनी दिलेली खरी शिकवण आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

शिंदे गटाकडूनही मदतीचे आवाहन

दरम्यान, शिवसेना शिंदे गटानेही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक, मंत्री, खासदार आणि आमदारांना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राजकीय पक्षांकडून मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!