---Advertisement---

दाऊदच्या वडिलोपार्जित घरावर बुलडोझर!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घरावर आता महापालिकेचा बुलडोझर फिरणार आहे. मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेन येथे असलेल्या दाऊदच्या कुटुंबाशी संबंधित जुन्या इमारतीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तोडकामाची कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी महापालिकेने अधिकृत नोटीसही जारी केली आहे.

भेंडी बाजारातील पाकमोडिया लेन हा परिसर दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचे जुने ठिकाण म्हणून ओळखला जातो. दाऊदचे वडील इब्राहिम कास्कर यांचे घर आणि त्यासंबंधित हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही इमारत अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

दरम्यान, ही इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. इमारतीच्या भिंती आणि छत कोसळण्याचा धोका असल्याने स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडूनही सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने इमारत जमीनदोस्त करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दाऊदच्या कुटुंबाशी संबंधित या ऐतिहासिक ठिकाणावर आज महापालिकेची कारवाई होणार असल्याने मुंबईत या बातमीची मोठी चर्चा सुरू आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!