---Advertisement---

सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेसचं शिंदे गटाला थेट आव्हान!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : सोनिया गांधी यांच्या ‘जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत हे पुस्तक फाडून निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे.

शिंदे गटाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात मजकूर असल्याचा आरोप करत पुस्तक फाडले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.

यावेळी सपकाळ यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना, “ही गद्दार गँग असून त्यांनी राजकारणाचे विकृतीकरण केले आहे. त्यांच्याकडून सभ्यता आणि संस्कृतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे,” अशी टीका केली. तसेच पुस्तक न वाचताच त्यावर विरोध करण्यापेक्षा आधी ते वाचावे आणि त्यानंतर चर्चा करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. “शिंदे शिवसेनेमध्ये एवढीच हिंमत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात घेतलेल्या निर्णयांचे जीआर फाडून दाखवावेत,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.

या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता काँग्रेस विरुद्ध शिंदे शिवसेना अशा राजकीय संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!