---Advertisement---

वीस वर्षांनंतर शाळेच्या अंगणात पुन्हा भरला आठवणींचा वर्ग!

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : शाळेचे तेच वर्ग, तेच मैदान आणि जुन्या आठवणींचा दरवळ… तब्बल वीस वर्षांनंतर मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलच्या २००६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी पुन्हा शाळेच्या अंगणात एकत्र आले. ‘स्मृती सौरभम्’ या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने मित्रमैत्रिणींच्या भेटी, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सोहळा भावपूर्ण वातावरणात रंगला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत गुरुजन आणि मित्रमंडळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित गुरुजनांचा फेटा, भेटवस्तू, पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक योगेश कबाडे यांच्यासह चाचा बिराजदार, बाबासाहेब निंबाळकर, एम. एन. मणियार, एस. सी. मुजावर, आर. एस. पडवलकर, एस. एन. टिंगरे, स्वामी मॅडम, ए. के. खजूर्गीकर आणि बी. एल. सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक योगेश कबाडे यांनी अडचणीत असलेल्या वर्गमित्रांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन केले. तर बाबासाहेब निंबाळकर यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम माजी विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.

स्नेहमेळाव्यात प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वतःची ओळख करून देत शैक्षणिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक वाटचालीचा परिचय करून दिला. मराठा मंदिर गीत, बँडच्या तालावर मानवंदना आणि सामूहिक कवायतींनी शालेय जीवनातील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दहावीच्या अ, ब, क, ड आणि ई तुकड्यांतील शंभरहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. उपस्थित प्रत्येकाला ‘स्मृतिगंध’ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) लॅब उभारण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगलेल्या या सोहळ्याने जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ केले. वीस वर्षांनंतर पुन्हा शाळेत जमलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा केवळ भेटीचा कार्यक्रम न ठरता गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह शाळेसाठी योगदान देण्याची प्रेरणा देणारा ठरला.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!