मुंबई : आयसीसी एकदिवसीय क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय खेळाडू पुन्हा एकदा अग्र स्थानी आहेत. फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली व हिट फाॅर्म मध्ये असणारा रोहित शर्मा यांनी घवघवीत यश मिळवल आहे. विराट कोहलीने या क्रमवारीत पहिले तर रोहित शर्माने दुसरे स्थान कायम ठेवले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिले आणि द्वितीय स्थान कायम राखले आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीने भारतीय संघाच्या नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये एकदिवसीय सामने खेळले होते. मात्र, रोहित शर्मा याला आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे एकदिवसीय सामन्यांना मुकावे लागले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने ८९ आणि ६३ धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट कोहली याच्या गुणांमध्ये चांगली वाढ झाली. सद्या तो ८७० गुणांवर आहे. तर, रोहित शर्माने कोरोना काळापासून एकही वन-डे सामना खेळला नसून ८४२ गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे.
टॉप 5 फलंदाज
1. विराट कोहली (भारत)
2. रोहित शर्मा (भारत)
3. बाबर आजम (पाकिस्तान)
4. रॉस टेलर (न्यूझीलंड)
5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रलिया)
टॉप 5 गोलंदाज
1. ट्रेन्ट बाउल्ट (न्यूझीलंड)
2. मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान)
3. जसप्रीत बुमराह (भारत)
4. मेहंदी हसन (बांगलादेश)
5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रेलिया)